तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

शहरातील दोन प्रशासकीय कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा संभ्रममोताळा- 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. मात्र मोताळा येथील दोन प्रशासकीय कार्यालयांना या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन कितवा? याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. मोताळा तहसील कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत ७२ वा वर्धापनदिन समारंभ संपन्न होत आहे. तर येथीलच नगरपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहनाच्या निमंत्रण पत्रिकेत आधी ७२ वा व नंतर पेनाने खोडून ७३ वा केल्याने शहरातील नागरिकांना याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 
            देश स्वातंत्र्य व्हावा या करिता अनेक क्रांतिकारक यांना आपल्या जिवाचे प्राण गमवावे लागले देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला यांची जाणीव असावी देशासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांची आठवण करून देणारा दिवस 15 ऑगस्ट ह्या दिवशी शासकीय निमशासकीय कार्यालयात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण केले जाते तालुका स्तरावर असलेल्या विविध कार्यालयात मार्फत ध्वजारोहण कार्यक्रमा करीता मान्यवरा ना निमंत्रण पत्रिका देण्यात येतात आज गुरुवार 15 ऑगस्ट 2019 रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिना सुद्धा तहसील कार्यालय मोताळा,नगरपंचायत कार्यालय मोताळा मार्फत शहरातील तालुक्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या असुन सदरच्या निमंत्रण पत्रिका ह्या मान्यवरांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत.
    मोताळा तहसील कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत ७२ वा वर्धापनदिन समारंभ संपन्न होत आहे. तर येथीलच नगरपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहनाच्या निमंत्रण पत्रिकेत आधी ७२ वा व नंतर पेनाने खोडून ७३ वा वर्धापनदिन असे करून सदरच्या निमंत्रण पत्रिकेचे वितरण मान्यवरांना करण्यात आले स्वातंत्र्य दिनाचा नेमका वर्धापन दिन कितवा या बाबत उदासीन असलेल्या या कार्यालयाची कार्यपद्धत ही नागरिकांना न समजणारी असुन जेष्ठ पिढीचे असे हाल असतांना येणाऱ्या पिढी ला आपण नेमकं शिक्षण कसलं देतोय हे कोड  सुटता सुटत नाही आहे

No comments:

Post a comment