तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांच्या सभेत घुसुन जाब विचारु-अजित नवलेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
सांगली, कोल्हापुर भागामध्ये पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री व मंत्र्याकडुन जाहिरतबाजी करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा दुष्काळी छायेत असतांना या भागातील अनेक शेतकर्‍यांना अतिरिक्त क्षेत्राचा विमा काढला हे खोटे कारण पुढे करुन पिक विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी सध्या महाजानदेश यात्रेच्या निमित्ताने प्रचार करत असलेल्या मुख्यमंत्र्यांना सभा मध्ये घुसुन जाब विचारला जाईल असे आव्हान किसान सभेचे राज्य सेक्रेटरी अजित नवले यांनी दिले आहे.
अजित नवले हे परळी येथे आले असता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी किसान सभेची येणार्‍या काळातील भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भापा सरकार हे शेतकरी विरोधी असुन निवडणुका जिंकण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे मुद्दे समोर असुन देशापुढील सर्वात मोठे शेती संदर्भातील प्रश्‍नांकडे डोळे झाक करत इतर प्रश्‍नांवर प्रकाझोत टाकून निवडणुका जिंकल्या यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न अधिक गंभीर बनले आहेत. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. केंद्रीय अर्थमंत्री झिरो बजेट अ‍ॅग्रीकल्चरवर बोलतात त्यांचे हे ब्रीद गाय, गोमुत्र, गोबर या भोवती असुन या सरकारला शेतकर्‍यांचा विकास करावयाचा नाही उलट चार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा देशात रुजु करावयाची आहे. महाराष्ट्रात शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी मराठवाडा विदर्भातील शेतकर्‍यांना दुष्काळी पॅकेज व शेतकर्‍यांचा पिक विमा तात्काळ दिला नाही तर किसान सभेच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना सध्या त्यांच्या सुरु असलेल्या दौर्‍यात सभामध्ये घुसुन जाब विचारु असे आव्हान दिले आहे. यावेळी ज्येष्ठनेते कॉ.पी.एस.घाडगे, कॉ.उत्तम माने, दिपक निपणे, भाऊसाहेब झिरपे, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment