तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

सारडगाव येथे सौ.राजश्री मुंडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्नमहिलांना सांगितले वृक्ष लागवडीचे महत्व
परळी वैजनाथ (प्रतिनिध) ः- तालुक्यातील मौजे सारडगाव येथे सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड व वृक्षावाटप करण्यात आली. महिलाशी संवाद साधत महिलांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. तसेच गावचे प्रश्न सोडविण्याचे व विकास करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्‍वासन सौ.राजश्री मुंडे यांनी दिले.
 तालुक्यातील मौजे सारडगाव येथे शनिवार, दि.10 ऑगस्ट रोजी  सायंकाळी 7:00 वाजता सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षलागवड व वृक्षावाटप  करण्यात आली. यावेळी गावातील परिसरात 4,200 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  दरम्यान सौ.मुंडे ह्या बोलतांना म्हणाल्या की, प्रत्येकाने वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, जेनेकरुन पाऊस पडेल व निसर्गाचा समतोल राखला जाईल. वृक्षांच्या संगोपन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमला जि.प.सदस्य अजयजी मुंडे. प्रा.डॉ.मधुकर आघाव, जि.प.सदस्या सौ. रेखाताई मधुकरराव आघाव, सारडगावच्या सरपंच सौ.गिताताई वसंतराव आघाव या कार्यक्रमाचे अध्यक्ष दगडु शेठ आघाव सर्व बचत गटाच्या महिला, महिला भजनी, अंगणवाडी सेविका, आशा ताई, पाणी फाउंडेशन महिला व गावातील महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी महिलासी संवाद साधला व गावचे प्रश्न सोडविण्याचे व विकास करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्‍वासन दिले. जि.प.सदस्य अजय मुंडे, आघाव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमचे प्रस्थाविक वंसत व्यंकटराव आघाव यांनी केले या कार्यक्रमाला माऊली मुंडे (उपसरपंच), भानुदासराव तांदळे, संदीप तांदळे, एच.एन.आघाव, सुधाकर तांदळे, प्रभाकर गायकवाड, मारुती घणघाव, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a comment