तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

भाजपा नेत्यांची जीभ पुन्हा घसरली, आमदार विक्रम सैनी यांचे महिलांबाबत बेताल वक्तव्य यांचा जाहीर निषेध - सपना माळी, सामाजिक युवा कार्यकर्त्या


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : महिलांचा आदर कसा करावा याचे क्लासेस लावा पक्षातील नेत्यांना मोदीसाहेब
भाजपामधले बॅचलर्स आता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करू शकतात, भाजपातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी आता आनंदी राहिले पाहीजे, ते आता काश्मीरला जाऊन जमिनीचा प्लॉट विकत घेऊ शकतात, तसेच तिथल्या गोऱ्या मुलींशी लग्न करू शकतात, अशी मुक्ताफळे आ. विक्रम सैनी यांनी उधळली आहेत.
याआधी देखील बर्याच भाजपा नेत्यांची जीभ वारंवार घसरत आली आहे, यांना नेमका माज कशाचा आहे हेच समजत नाही, सत्ताधारी आहेत म्हणून की भाजपाचे आहेत म्हणून? याचा जनतेनी विचार करायला हवा. पण भाजपातील महिला नेते, पदाधिकारी,कार्यकर्त्या अशा वक्तव्यांवर काहीच कसे बोलत नाहीत हा ही एक आम्हा स्त्रियांना पडलेला मोठा प्रश्न आहे?
 भाजप पक्ष सत्तेवर असल्याने जनता सत्ताधारी म्हणून मोठ्या विश्वासाने पाहत आहे, आणि हे लोक नेहमी जनतेचा विश्वासघात करत आहेत. *हे लोक कधी जवानांच्या बायकांबद्दल बोलतात तर कधी मुली पळवायच्या भाषा करतात.भाजपा सत्तेत नेमके आलेत कशासाठी हेच समजत नाही, महिलांना पळवायला आलेत की महिलांना बेइज्जत करायला, की विकासकामे करायला. पण एकंदरीत यांचे मुक्ताफळे ऐकून जनतेचा विकास करण्यासाठी म्हणून तर वाटत नाही.
 महिलांचा आदर करायचे कोर्सेस करायला लावा मोदीसाहेब पक्षातील नेत्यांना, हे जर असेच चालू राहिले तर जनता घरवापसी करेल. महिलांचा अपमान सहन होणारा नाहीच, अश्लिल बोलण्यापेक्षा सत्कार्य करण्यासाठी वेळ खर्ची घालाल तर विकासात भर पडेल.
  आमदार विक्रम सैनी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांनी केला
बेटी बचाओ, भाजपा भगाओ

No comments:

Post a Comment