तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतिने महिलांच्या सुरक्षेते बाबत पोलिसांना निवेदनपरळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :- 
परळी शहरात मुलींच्या छेडछाडीचे सातत्याने प्रकार घडत आहेत.यामुळे महिला व मुलींना घरा बाहेर पडणे अवघड झाले आहे गेल्या आठवड्यात असाच एक प्रकार बीडच्या पोलिस अधिक्षकाकडे गेला होता तरी ही सातत्याने असे निधननीय प्रकार घडतच आहेत.तसेच पोलिसांनी स्थापण केलेले दामीनी पथकही निषक्रीय ठरत आहे.यामुळे शहारातील रोडरोमिओ बिंनधास्त शाळा काॕलेज व सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत असुन मुलीच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत.या रोडरोमिओचा बंदोबस्त नाही केला तर काही अघटीत प्रकार घडण्याची दाट शकता आहे.तसा प्रकार घडल्यास पोलिस प्रशासन जवाबदार राहिल.पोलिस प्रशासनाने दामिनी पथक सक्रीय करावे,महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाय योजना कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतिने तिव्र आंदोलन   मागणीचे निवेदन  राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतिने परळी शहर व संभाजी नगर पोलिसांना दिले आहे.
यानिवेदनावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना रोडे,अन्नपुर्णा जाधव,श्रध्दा हालगे,अनिता धुमाळ,विजयाताई दहिवाळ,उमा धुमाळ,गोदावरी पोकरकर,जखीरा शेख,इंदु उजगरे,विमल उजगरे आदि महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Post a comment