तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

धनंजय मुंडेंनी केला पुरग्रस्त सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरासंकटाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन

सांगली/सातारा (प्रतिनिधी) :- दि.10........... विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत पुरग्रस्त सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरा केला. येथील परिस्थिती पाहुन मन विदीर्ण झाले आहे. लोकांचा आकांत आजुनही कानात घुमतो आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पात्र नाही, मात्र आम्ही तुम्हाला सर्वोतोपरी मदत करू असा शब्द त्यांनी पुरग्रस्त नागरिकांना दिला.

आज दिवसभरात श्री.शरचंद्रजी पवार, धनंजय मुंडे, रोहितदादा पवार यांनी कराड, तांबवे, पलुस, बिचुड, रेथरे, टकारी, रामानंदनगर, भिलवडी, वसागडे व सांगली या भागाचा दौरा केला. अनेक ठिकाणी धनंजय मुंडे यांनी स्वतंत्ररित्या ही जावुन परिस्थितीची पाहणी केली, गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला. संकटाच्या या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

No comments:

Post a comment