तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलच्या ' दीक्षा आहिरे ' ने घेतली गरुडझेप



गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

 क्रिडा व शैक्षणिक संकुल म्हणून देशभरात नावाजलेल्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल कोकमठाण ता.कोपरगाव मधील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात दैदिव्यमान कामगिरी करून शाळेच्या नावलौकिक भर पाडली आहे. या वेळी ही भारत सरकार  मानव संसाधन विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात सी.बी.एस, इ. ची 'दीक्षा राहुल अहिरे' हिने घवघवीत यश संपादन केले तिच्या या यशा बद्दल आत्मा मालिक माऊली,संत परमानंद महाराज,व समस्त विश्वात्मक परिवार,संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन ,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे, चेअरमन कांतीलाल पटेल,मुख्याध्यापक नामदेव डांगे,उपमुख्याध्यापिका वंदना थोरात,व्यवस्थापक सुरेश शिंदे, शिक्षक सुमित पाटील,अश्विनी तोडकर,प्रवीण कदम व सर्व शिक्षक वृद यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment