तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

ओबीसी आरक्षण कपाती विरुद्ध गेवराई तहसीलदारांना निवेदनसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि ९ _ महाराष्ट्र शासनाने ओबीसीचे राजकीय क्षेत्रातील कपात केलेले आरक्षण ओबीसीची जातवार जनगणना होईपर्यंत पूर्ववत सुरू ठेवावे या व अन्य मागण्यांचे निवेदन गेवराईचे तहसीलदार यांना ९ ऑगस्ट रोजी ओबीसीच्या वतीने देण्यात आले.
            ९ ऑगस्ट रोजी गेवराईच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात ओबीसीचे राजकीय क्षेत्रातील आरक्षण  कपात करू नये, विविध महामंडळाची थकित कर्जे माफ करावी, महामंडळास आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थीच्या थकित सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या त्वरित वितरित कराव्यात, भटक्यांना आदिवासींप्रमाणे सवलती लागू कराव्यात, ओबीसीच्या आय ए एस झालेल्या व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या ३१४ उमेदवारांच्या रद्द केलेल्या नियुक्त्या पूर्ववत करून त्यांना त्वरित सेवेत समाविष्ट करून घ्यावे, बारा बलुतेदार यांच्या करिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्याला किमान २oo कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात, शेतकरी यांच्या धर्तीवर बारा बलुतेदारांना पेन्शन लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
     निवेदनावर सुनील पोपळे, राजेंद्र बरकसे, बप्पासाहेब पिंपळे, गोरखनाथ शिंदे, शंकर सूर्यवंशी, तुकाराम मस्के, रामेश्वर राऊत, भारत तुरुकमारे, राजकुमार पोपळघट, सुभाष आणेराव, गोकुळ चोरमले, गजानन पांडे, अशोक गायकवाड, नागेश पंडित, चंद्रकांत पुरी, राजेंद्र राऊत, धुताडमल सुदाम, सुंदर पिंपळे, अनिल गायकवाड, नंदकुमार पोपळघट, विजय पंडित, कैलास मोरे, ज्ञानेश्वर पांचाळ, सचिन गायकवाड, सदाशिव सोनवणे, ज्ञानेश्वर पंडित, गणेश पंडित, टोनपे सुरेश, गणेश पंडित आदींच्या सह्या असून हे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment