तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 16 August 2019

सात्रळ, सोनगाव, धानोरेतील तरुत पुरग्रस्तांना मदतीसाठी सरसावले
जिवना उपयोगी वस्तूंचा किट बनवून देण्यात आला.


सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
     सांगली,कोल्हापुर या जिल्ह्यात पंचगंगा,कष्णा आणि इतर नद्यांनी अनेकांचे प्राण घेत अनेकांचे संसार उधवस्त केले.संकटात एकमेकांना साह्य व्हाव,संकटांनी खचून न जाता त्यांना नवी प्रकारची उमेद मिळावी. हाच एक कार्या मागचा उद्देश आहे.
      सात्रळ,सोनगाव, धानोरे या ग्रामिण भागात जमा केलेली रक्कम आणि धान्य दोन दिवसात प्राप्त झाल्या नंतर ही सर्व मदत पुरग्रस्तांना थेट सांगली येथील धुळवाडी,माळवडगाव अशा ठिकाणी स्वतः या तरूण वर्गातील लोकांच्या मदतीने पोहच करण्यात आले. 
       अति महत्त्वाचे म्हणजे घर चालविण्यासाठी लागणारे साहित्य त्यात गव्हाचे पिठ,मिठ पिशवी, गोडतेल,तूप,चहा पावडर, तांदुळ,काडी पेटी,अगरबत्ती पुडा,पाणी बाॅटल,कपडे,ब्लॅकेट, अशा प्रकारच्या वस्तू या किट मध्ये पॅकींग करून हा किट तयार करून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला देण्यात आला.
    यामध्ये यात विजय वाघचौरे, गोकुळ नालकर,संतोष जेजुरकर,रोहित शेजवळ,पप्पु डुक्रे,अर्जुन लांडगे,सामजिक कार्यकर्ते रविंद्र दिघे,हरि भाऊ बलसाणे,गणेश रसाळ,तुषार लकारे,आदि ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
    पुरग्रस्तांना मदत देण्यासाठीचे नियोजन युद्ध पातळीवर यांनी स्वतःपुढाकार घेवून करण्यात आले.याचे मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment