तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

भारतीय कुस्तीचे अराध्य दैवत - खाशाबा जाधव         खाशाबा जाधव हे भारतीय कुस्तीला आंतरराष्ट्रीय ओळख करून देणारे कुस्ती महर्षीच आहेत ! उभे आयुष्य कुस्तीसाठी वाहून घेणाऱ्या या भारत मातेच्या महान भूमीपुत्राने स्वातंत्रोत्तर काळातील कोणत्याही  वैयक्तीक खेळातील पहिला ऑलिंपिक पदक विजेता बनण्याचा बहुमान मिळविला. खाशाबा जाधव हे ऑलिंपिक मधील भारताचे पहिले पदक विजेते खेळाडू आहेत. भारतीय कुस्तीच नाही तर समस्त भारतीय क्रिडा जगताला थोर परंपरा देणाऱ्या या महान कुस्तीसम्राटाला महान कार्याला  सलाम व त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

           खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्हयातील गोलेश्वर या खेडेगांवात अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडिल दादासाहेब जाधव हे सुध्दा कुस्तीगिर होते. दादासाहेबांना पाच मुले होती. त्यापैकी सर्वात लहान खाशाबा होते. कुस्ती हा जाधव कुटुंबा या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. दादासाहेबांना वाटायचे  त्यांच्या सर्वच मुलांनी कुस्तीत नाव कमवावे. परंतु कुस्तीत सर्व भावंडात फक्त खाशाबाच पारंगत होते. अगदी लहानपणापासूनच खाशाबांना कुस्तीचे प्रेम जडले. दादासाहेब खाशाबांना चार वर्षाचा असल्यापासूनच वेगवेगळ्या आखाडयात कुस्त्या बघायला घेऊन जात असत. बाल खाशाबा वडिलांच्या खांद्यावर बसून कुस्त्या बघायचे.

                वयाच्या आठव्या वर्षी खाशाबाने कुस्तीच्या आखाडयात पहिल्यांदा पाऊल टाकले. तेथे बाल खाशाबाने स्थानिक विजेत्या मल्लाला आस्मान दाखविले. त्यानंतर ते या क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राटच बनले ! बाबुराव बलवडे व बेलापूरी गुरुजी हे त्यांचे कुस्तीतील सल्लागार होते. खाशाबांना कुस्तीशिवाय  मल्लखांब, धावणे, पोहणे, जिम्नॅस्टीक या खेळांमध्येही विशेष आवड होती. ते या सर्व खेळांचाही नियमीत सराव करायचे. त्यामुळे त्यांची शरिरयष्टी भक्कम व बळकट बनली होती. त्यांचे पाय इतर पहिलवानांपेक्षा अत्यंत चपळ होते. त्यामुळे ते इतर सर्वांपेक्षा वेगळे भासायचे. त्यांची ही कलात्मकता बघून इंग्लिश कोच रोझ गार्डनर यांनी १९४८ च्या ऑलिंपिकसाठी त्यांना तयार केले. 

               कऱ्हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये सन १९४० ते ४७ मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पुढे जात त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी केवळ कुस्तीचेच फड जिंकले नाही तर इतरांचे मनेही ! याचाच परिपाक म्हणजे त्यांना प्रथम राज्य व नंतर राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. त्या काळी त्यांनी तत्कालीन राष्ट्रीय विजेता निरंजन दासला हरविले. खाशाबाची ही तडफदार कामगिरी बघून राष्ट्रीय कुस्ती महासंघाने सन १९४८ च्या ऑलिंपिकला त्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला.

                सन १९४८ च्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी प्रथमच भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यावेळी त्यांना देशी व आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमातील तफावत जाणवली. भारतात ते मातीवर कुस्ती खेळायचे, तर ऑलिंपिकमध्ये मॅटवर ( गादीवर ) कुस्त्या व्हायच्या. या सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खाशाबांनी सहभागी ४२ मल्लांमध्ये सहावा क्रमांक मिळविला होता.भले त्यांना त्या स्पर्धेत पदक मिळाले नाही. पण देशासाठी तो नक्कीच गौरवाचा क्षण होता.

               बरोबर ४ वर्षांनी सन १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. परंतु त्यांच्यासाठी ते एक प्रकारचे आव्हानच होते. त्यांना गुणवत्ता सिध्द करायची होती. त्यावेळी ऑलिंपिकपटूंनाही सरकार कडून विशेष आर्थिक मदत मिळत नसायची. त्या खर्चाचा बराचसा वाटा खेळाडूंना स्वतः उचलावा लागायचा. खाशाबांची आर्थिक परिस्थिती एवढा भार सोसण्याएव्हढी भक्कम नव्हती. त्यावेळी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य खर्डीकर सरांनी स्वतःचे घर गहाण ठेवून खाशाबांची आर्थिक मदत म्हणून सात हजार रुपये दिले होते. पतियाळाच्या महाराजांनीही मदत दिली होती. काही स्थानिक लोकांनीही मदत केली. त्यानंतरच त्यांना ऑलिंपिकला जाणे शक्य झाले.

               तेथे त्यांनी रशिया, मेक्सिको, कॅनडा, जर्मनी, व आखाती मल्लांशी दोन हात केले. सलग पाच सामने जिंकल्यानंतर ते उपांत्य फेरीत पोहोचले. वरील सर्व सामने त्यांनी पाच मिनिटांच्या आतमध्येच जिंकले. उपांत्य फेरीपूर्वी त्यांचा  सामना जपानी मल्लाशी होता. दोघेही तुल्यबळ होते.पंधरा मिनिटे घमासान लढाई झाली. शेवटी केवळ एका गुणाने जपानी मल्लाने बाजी जिंकली. या लढतीनंतर त्यांचा पुढचा सामना लगेचच रशियन पाहिलवानाशी लावण्यात आला. वास्ताविक पाहता हे नियमांना धरून नव्हते. कारण नियमानुसार एकाच पहिलवानाच्या दोन लढतीदरम्यान अर्ध्या तासाचे अंतर हवे असते. परंतु संयोजकांनी त्यांना लगेच उपांत्य सामना खेळायला लावला. थकलेल्या अवस्थेतच खाश

No comments:

Post a comment