तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

दाढ बु. येथे कृषिकन्यांकडून बियाण्यांचे वर्गीकरण बाबत प्रात्यक्षिक


सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित कृषि महाविद्यालय भानासहिवरे येथील कृषिकन्यांनी दाढ बु. येथे बियाण्यांचे वर्गीकरण बाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
     यावेळी कृषिकन्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाण्यांचे वर्गीकरण बाबत माहिती दिली.तसेच बियाण्यांच्या विविध टॅग बद्दल माहिती दिली.तसेच बियाणे विकत घेताना टॅग बघूनच विकत घ्यावा असा संदेश देखील दिला.कोणत्या टॅग चा काय अर्थ असतो ह्याचे महत्त्व सांगितले.
 कृषिकन्यांनी कृषि महाविद्यालय धुळे येथील वी एस गिरासे सर व ए.बी.गायकवाड सर तसेच कृषि महाविद्यालय भानसहिवरे चे प्राचार्य डॉ दरंदले,प्रा.एम.आर.माने,प्रा.जे.जे.रहाणे,प्रा. के.बी.पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रात्यक्षिकासाठी कृषिकन्या जयश्री खकाळे, ऋतुजा जाधव, मृगया निकुंभ, मानसी राणे,  मोनिका तनेरू मार्गदर्शन केले.

No comments:

Post a comment