तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

रिपाई चळवळीचा व परळीचा बुलंद आवाज हरपला - धनंजय मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि 11 ----- धम्मानंद मुंडे यांच्या निधनाने परळी शहरातील रिपाईचा चेहरा आणि या चळवळीचा व परळी शहराचाही बुलंद आवाज हरपला आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

परळी शहरातील सर्वपक्षीय जुन्या आणि नव्या नेत्या,  कार्यकर्त्यांमध्ये उठबस असणारा, आणि परळीच्या प्रत्येक माणसाला माहीत असलेले ते एक व्यक्तिमत्व होते. रिपाई चळवळीच्या माध्यमातून त्यांनी तर कार्य केलेच त्या बरोबरच शहराच्या सर्वपक्षीय कोणत्याही उपक्रमात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग ही त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने परळी शहराचेही मोठे नुकसान झाले असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

No comments:

Post a comment