तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांच्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या शिकवणीला फटका

शैक्षणिक नुकसाना संदर्भात विद्यार्थ्यांची प्रशासणाकडे धाव

 रिसोड ता.13 ऑगस्ट 19 = शासणाचे कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदाना प्रति दुटप्पी धोरण आसल्याच्या आरोपाने ता.9 ऑगस्ट पासुन तालुक्यातील आसेगाव येथिल प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक संपावर गेल्याने येथिल कला,विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.हे नुकसान होता कामा नाही.म्हणून रिसोडचे तहसीलदार आर.यु.सुरडकर यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देत शिक्षकांच्या मागण्याकडे शासणाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
 आसेगांव येथिल प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग अकरावी,बारावी कला,विज्ञान शिखेचे शिक्षक ता.9 ऑगस्ट पासुन संपावर गेले आहे.यामुळे येथिल विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांना अनुदानासह वेगवेगळ्या मागण्या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयापुढे अमरण उपोषणाचा पवित्र घेतला आहे.येथिल शिक्षकांच्या संपामुळे अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.यामुळे वर्ग अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात शासणाने लक्ष घालुन हा प्रलंबित प्रश्न सोडवुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे आशा प्रकारचे लेखी निवेदण कु.पुजा काशिनाथ खानझोडे.कु.नेहा विठ्ठल रेखे कु कविता सुधाकर पडघण.कु.शुभांगी रमेश कुटे.कु.सपना पांडुरंग खंदारे.कु.वृषाली बळवंता अंभोरे.कु.वैष्णवी लोडजी धूड.कु.वंदना शंकर माणोरकर.कु.दिपाली केशव खानझोड.कु.शिल्पा सिताराम खानझोडे.शंकर राजाराम खानझोडे या विद्यार्थ्यांनी रिसोड तहसिलदार आणि ठाणेदार यांना लेखी निवेदन दिले.शासणाने विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे आशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
9960292121
9420352121

No comments:

Post a comment