तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

गेवराईच्या झुंजार नारी मंचकडून पुरग्रस्तांसाठी मोलाचे योगदानसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १२ _ कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेवराईकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील झुंजार नारी मंचचे मोठे योगदान दिले आहे. या स्तुत्य उपक्रमास आणखी मदतीचा ओघ सुरूच आहे. नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झुंजार नारी मंचच्या वतीने जीवनावश्यक वस्तू सुपुर्द केल्या.
             काही दिवसांपासून गेवराईकरांनी विविध माध्यमातून 'तुम्ही - आम्ही गेवराईकर' या टॅग लाईन खाली मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला गेवराई शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येकजण जशी जमेल तशी मदत करत आहे. ही मदत येथील शास्त्री चौक याठिकाणी एकत्रित जमा करून पूरग्रस्त भागात पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येकजण आपापल्या परीने सहभागी होऊन मदत करत आहे, तर या मोहिमे मध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीसह अनेक व्हाट्सअप ग्रुप व सामाजिक संघटनांसह दात्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे सकाळपासून दिसून आले. प्रत्येकजण जमेल तशी मदत करत असून गेवराईच्या शास्त्री चौक येथे ही सर्व मदत व साहित्य जमा करण्यात येत आहे. यानंतर ही सर्व मदत व साहित्य एकत्र करून कोल्हापूर व सांगली येथे पाठवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर ही मदत जमा होत असून प्रत्येक गेवराईकर आपल्या परीने मदत करून आपली माणुसकी जपत असल्याचे दिसून येत आहे.  हा उपक्रम असाच चालू ठेवून जशी जमेल तशी ही मदत पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार असल्याने आणखी ज्यांना काही मदत करायची असेल त्यांनी शास्त्री चौक येथे जमा करावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान झुंजार नारी मंचच्या सचिव सौ. आशा वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अध्यक्षा सौ. सिता महासाहेब, उपाध्यक्षा सौ. दक्षा दयाराम वानखेडे/सानप यांच्या प्रयत्नातून पुरग्रस्तांसाठी श्री. अनिकेत शिवाजी पंडित, माया वसंत निकम, सुरज राऊत, प्रणव शेटे तसेच श्रीमती सरला सुरेश दाभाळकर, सौ. लिला विक्रम काळे, सौ. पल्लवी कोल्हे, सौ.भारती गणपतराव कोकाट, श्रीमती नुसरत युनूस सय्यद, श्रीमती अनुराधा आदिनाथ भारती, श्रीमती पल्लवी गोगुले, श्रीमती सुनिता रामनाथ उगलमुगले, श्रीमती सीमा सुनील पारे, श्रीमती माधुरी संदीप दाभाडे, श्रीमती दिपाली निलेश माळीच आदी सर्वांनी कपडे, स्वेटर, ब्लँकेट, धान्य, बिस्कीट, फरसान आदींसारख्या सारख्या वस्तूंंच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केली.
        यावेळी पत्रकार सुभाष मुळे, राम महासाहेब, श्री. गणेश भागवतराव सानप, जुनेद बागवान, नानासाहेब पवार, सुनिल ठोसर, सुरेश कापसे, सौ. विद्या जाधवर, झुंजार नारी मंचच्या अध्यक्षा सौ. सिता महासाहेब, उपाध्यक्षा सौ. दक्षा दयाराम वानखेडे/सानप, सौ.भारती गणपतराव कोकाट आदी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment