तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

रिपाईनेते धम्मानंद मुंडे यांचे -हदयविकाराने निधनमराठवाडवाड्याचा बुलंद आवाज हारपला

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांचे रविवार दि.11 रोजी सायंकाळी 5वाजण्याच्या सुमारास हदयविकाराने निधन झाले आहे. सोमवार दि.12 रोजी सकाळी 9 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांचे अंत्यदर्शनासाठी सकाळ पर्यत भिमवाडी येथील रिपब्लिकन न्याय भवन या  राहत्या घरी ठेवण्यात आले आहे.

    फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील प्रबोधनकार, शाहिर आणी दलित पॕन्थरचा धगधगता निखारा आणी रिपब्लिकन पार्टी  आॕफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष, बीडच्या  दक्षता समितीचे अनेकाळ सदस्य म्हणुन  काम पाहिले होते अश्या विविध पातळीवर  काम केले होते.अश्या लोकाभिमुक नेत्याचे आज -हदयविकाराने निधन झाले आहे.

     मुंबईचे शिवाजी पार्क असो वा दिल्लीचे रामलिला मैदानावर अश्या विविध पातळीवर त्यांची अन्यायाच्या विरुध्द परखड भाषणी गाजली होती.मराठवाडा नामंतराच्या लढ्यातही मोठे योगदान त्यांनी दिले होते मुंबईत वरळी आणी मराठवाड्यात परळी असा चळवळीचे केंद्रबिंदू म्हणुन परळीचा उल्लेख धम्मानंद मुंडे यांच्या मुळे ओळखले जायचे. आपल्या राजकीय चळवळीत त्यांनी अनेक कार्यकर्ते नेते घडविले अस हे चालत बोलत विद्यापीठच होते.    राजकीय ,सामाजिक कार्यासोबत धार्मिक कार्यात अग्रगण्य होते.बौध्द धम्म परिषदेची हि मोठे व्यापक आयोजन केले होते.अनेकांचे मंगल परिणय पारपाडले होते. अश्या नेत्याचा अचानक एक्झिट होणे फुले-शाहु-आंबेडकर चळवळीला फार मोठा धक्का बसला आहे.
धम्मानंदजी मुंडे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुल,दोन मुली,भाऊ भावजया असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a comment