तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले रिपाइं नेते धम्मानंद मुंडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १३ ---- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज रिपाइंचे दिवंगत नेते धम्मानंद मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

   रिपाइं नेते धम्मानंद मुंडे यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी तीव्र दुःख व्यक्त करून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा धडाडीचा नेता काळाने हिरावून नेल्याची शोकभावना व्यक्त केली होती. आज सकाळी त्यांनी धम्मानंद मुंडे यांच्या परिवाराची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नगरसेवक सचिन कागदे, भास्कर रोडे आदीसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment