तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

वैद्यनाथ साखर कारखाना येथे थाटात ध्वजारोहण

ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होता आल्याचा अभिमान - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १५......
      स्वातंत्र्य दिनानिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. जम्मू आणि काश्मीर राज्यातील ३७० आणि ३५ अ कलम रद्द करण्याच्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार होता आल्याचा आपल्याला आनंदच नव्हे तर अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले.
     वैद्यनाथ साखर कारखाना परिसरात ध्वजारोहणाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, मी लोकसभेत असल्याचा यावेळी जास्त आनंद आहे कारण देशावरील भळभळती जखम काढून टाकण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. या निर्णय प्रक्रियेत मला सहभागी होता आले. आता देश खऱ्या अर्थाने एकसंघ झाला आहे. मात्र याचवेळी महापुराने मोठी हानी केली असुन त्यांना मदतीची गरज आहे. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
        यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू व संचालक मंडळ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, भाजप - शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment