तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

परळीला सोयाबीनचा पिक विमा मिळण्यास सुरवातपालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे शेतक-यांनी मानले आभार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १४ ------ तालुक्यातील शेतक-यांना खरीप हंगामातील सोयाबीनचा पीक विमा मिळण्यास आजपासून सुरवात झाली असून आनंदित झालेल्या शेतक-यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.

 परळी व अंबाजोगाई तालुक्याला सोयाबीन चा पिक विमा मंजूर झाला होता परंतु गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे तो शेतक-यांना वाटप करण्यात आला नव्हता. याविषयी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी वेळोवेळी विमा कंपनी व कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नांमुळे  सदर शेतक-यांना आजपासून पीक विमा वाटप सुरू झाला. परळी तालुक्यातील शेतक-यांना प्रति हेक्टरी २९ हजार ७५९ रूपये तर अंबाजोगाई तालुक्याला प्रति हेक्टरी ३३ हजार ८८९ रूपये विमा मिळत आहे. ऐन दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना विमा वाटप करून मदतीचा हात दिल्याबद्दल शेतक-यांनी ना. पंकजाताई मुंडे यांची निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे आभार मानले.

  यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, भीमराव मुंडे, दशरथ गुट्टे, दगडूबा मुंडे, सतीश मुंडे, राजाभाऊ फड, सुरेश माने, नितीन ढाकणे, रविंद्र कांदे, चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, सुनील सोळंके, प्रभू आंधळे, माणिक सलगर आदींसह असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तुळशीराम पवार यांचे सांत्वन

शिवसंग्रामचे नेते तुळशीराम पवार यांच्या मातोश्री चे नुकतेच दुःखद निधन झाले. पालकमंत्रीना पंकजाताई मुंडे यांनी आज मिरवट येथे त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नगरसेवक सचिन कागदे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment