तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी शरद पाबळे व सरचिटणीसपदी संजीव जोशी यांची बिनविरोध निवड!


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई मराठी पत्रकार परिषदेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया 15जुलै 2019 पासून सुरू करण्यात आली.उमेदवारी अर्ज  दाखल करण्याच्या मुदतीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी श्री.शरद पाबळे व सरचिटणीस या पदासाठी श्री. संजीव जोशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2019-2021 यासाठी पुणे येथील सकाळ समुहाचे प्रतिनिधी श्री.शरद पाबळे यांची कार्याध्यक्षपदी व पालघर येथील दैनिक राजतंत्रचे संपादक श्री.संजीव जोशी यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे.
आज मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात नवनियुक्त श्री.शरद पाबळे व श्री.संजीव जोशी यांचा सत्कार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख व मा किरण नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बापूसाहेब गोरे(पुणे) व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री अच्युत पाटील(पालघर)यांनी काम पाहिले तसेच श्री शरद पाबळे व श्री संजीव जोशी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment