तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

क्रिकेटपटूंच्या पत्नींचे क्रिकेटबद्दलचे अज्ञान              चित्रपट व क्रिकेट हे दोन क्षेत्र अत्यंत ग्लॅमरस म्हणून संपूर्ण देशात अग्रेसर आहेत. चित्रपटातील कलाकारांना क्रिकेटपटूंबद्दल आकर्षण असते तर क्रिकेटपटूंची सिने तारे तारकांकडे ओढ असते. अनेक क्रिकेटपटू चित्रपटांकडे ओढले असून बऱ्याच क्रिकेटपटूंनी चित्रपटात कामेही केली आहेत. तर अनेक खेळाडूंच्या जीवनावर आधारीत चित्रपटेही निघाले आहेत. परंतु कोणी नावाजलेला चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्याचे तरी ऐकीवात नाही.

            बऱ्याच क्रिकेटपटूंनी सिनेतारकांशी विवाह केल्याचे अनेक उदाहरणे आपल्या नजरेसमोर तरळत असतीलच. आजच्या युगात बऱ्याच क्रिकेटपटूंच्या बायका आपल्या  क्रिकेटपटू नवऱ्या सोबत दौऱ्यावर जातात. जवळजवळ सर्वच क्रिकेटपटूंच्या बायकांना क्रिकेटविषयी ज्ञान असते. जरी काहींना लग्नापूर्वी नसेल पण लग्नानंतर चांगल्या प्रकारे अवगत होत असते. उदाहरणच बघायचे तर डॉ. अंजली तेंडुलकरांचे देता येईल. सचिनपेक्षाो  सहा  वर्षांनी मोठी असलेली अंजली क्रिकेटची गाढी अभ्यासक आहे. सचिनच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणीत तिनेच सचिनला सावरले व मोलाचा आधार दिला. साक्षी धोनी तर महेंद्रसिंग धोनीची सावली बनून त्याच्या सोबतच असते. धोनीच्या बऱ्याचशा व्यावहारीक बाबीही सांभाळते. रोहीत शर्माची पत्नी रितीका विदेश दौऱ्यावर त्याच्यासाठी बुस्टचे काम करते. इतरही अनेक क्रिकेटपटूंच्या बायकांचे क्रिकेटज्ञान चांगले आहे.

              भारताचा एक प्रतिभावान सलामीवीर, ज्याने दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारा लोकसभेचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरच्या पत्नीच्या क्रिकेट ज्ञानाविषयी थोडक्यात जाणून घेवू या.

                     भारताचा माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरने पत्नी नताशाच्या क्रिकेट प्रेम व ज्ञानासंबंधीचे दोन किस्से स्वतः विशद केले आहेत. ते आपल्यासाठी सादर करत आहोत.

                      लग्नापूर्वी गौतम व नताशाच्या कायम गाठीभेठी व्हायच्या. सन २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईोत होता. आपल्याला आठवत असेलच सुरुवातीच्या पडझडीनंतर गौतम गंभीरने ९७ धावांची झुंजार खेळी करुन भारताचा विजय सुकर केला होता. तो अंतिम सामना बघायला गौतमने आपली मैत्रीण नताशाला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा नताशाने मुंबईला सामना पहाण्यासाठी येण्याबाबत विचार करायला दोन दिवस मागितले. दोन दिवसानंतर तीने आपला निर्णय गौतमलााा कळविला की, फक्त एक सामना पहाण्यासाठी दिल्लीहून मुंबईला यायचे म्हणजे मोठा प्रवास करावा लागेल. त्यामुळे खूप धावपळ व त्रास होईल. केवळ एका सामन्यासाठी कशाला एवढी परवड करून घ्यायची. शेवटी तो सामना बघायला नताशा मुंबईला गेलीच नाही.

               गौतम गंभीरनेच नताशाच्या क्रिकेट जानकारीचा दुसरा किस्सा सांगितला.सुरूवातीच्या काळात आयपीएल मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हील्सकडून खेळायचा. तेंव्हा त्याने नताशाला मुंबई इंडियन्स व दिल्ली यांच्यातील सामना पाहण्यासाठी बोलविले. त्यावेळेस तिने हातात मुंबई इंडियन्सचा  झेंडा घेऊन त्यांनाच प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

                त्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सचिन तेंडूलकरने मारलेला एक चेंडू अडविताना गौतमच्या मांडीचा स्नायू दुखावल्याने त्याला ड्रेसिंग रूम मध्ये जावे लागले. संपूर्ण सामना संपेपर्यंत त्याला ड्रेसिंग रूममध्येच थांबावे लागले. सामना संपल्यानंतर रात्री नताशाने त्याला विचारले की, पूर्ण २० षटके संपली तरी तू मैदानात दिसला नाहीस, इतके दूर कुठे फिल्डींग करत होतास ?

             याचा अर्थ सरळ निघतो की, भोळ्या भाबड्या नताशाला क्रिकेटमधील बारीकसारीक गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळेच तीने बालिश प्रश्न विचारले. पुढे जात गंभीरच्या सानिध्यात राहून नताशाच्या क्रिकेट नॉलेजमध्ये भर पडत गेली व अज्ञान आपोआप दूर झाले.

            लेखक -

 क्रिकेट समिक्षक - दत्ता विघावे,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल.

प्रतिनिधी भारत.

मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट.

मोबाईल - ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment