तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

प्रा.अंगद फड यांना पीएच.डी. प्रदान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
धर्मापुरी येथील कै.शंकरराव गुट्टे ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक अंगद रामभाऊ फड यांना शारीरिक शिक्षण विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे दि.३१ जुलै रोजी ‘महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे राष्ट्रीय खेळाडूंच्या व्यक्तिमत्व विकासातील योगदान - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शारीरिक शिक्षण विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्पना झरीकर मॅडम, बहिस्थ परिक्षक डॉ.यशवंत कल्लेपवार, मार्गदर्शक प्रा.डॉ.गोविंद कदम यांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान करण्यात आली.  यावेळी प्रा.डॉ.डी.के.कांबळे, प्रा.डॉ.पी.एल.कराड आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.अंगद फड यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल कै.शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धर्मापूरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री भक्तराम फड, प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे, श्री संभाजी अंबेकर, प्रा.नारायण चाटे, प्रा.राम चौधरी, प्रा.शिवाजी मुंडे, प्रा.डॉ.तुकाराम चाटे, प्रा.अविनाश मुंडे, प्रा.डॉ.दगडू सिरसाट, प्रा.मामडगे यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन पांडूरंग मामडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नारायण चाटे यांनी केले.

No comments:

Post a Comment