तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 August 2019

दाढ बु. येथे कृषि माहिती केंद्राचे उद्घाटनसात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित कृषि महाविद्यालय भानासहिवरे येथील कृषिकन्यांनी दाढ बु. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यत आले.माहिती केंद्राचे उद्घाटन देविदास तांबे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी गावच्या सरपंच पूनम तांबे ,उपसरपंच गोकुळ गाडेकर तसेच इतर मान्यवर उपस्थितीत होते.
     माहिती केंद्रात पीक कीड व रोग व्यवस्थापन,पिकांचे खत व्यवस्थापन,माती परीक्षणाच्या पद्धती, बीजप्रक्रिया,विहीर पुनर्भरण तसेच शेतीविषयक पुस्तके व प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव उपलब्ध करण्यात आले आहे.शेतकरी बांधवांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे माहिती केंद्र फायदेशीर ठरणार आहे.कृषिकन्यांनी कृषि महाविद्यालय धुळे येथील वी.एस गीरासे सर व ए.बी. गायकवाड सर तसेच कृषि महाविद्यालय भानास हिवरे चे प्राचार्य डॉ. दरंदले सर,तसेच प्रा.एम आर माने,प्रा.जे जे रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषिकन्यां जयश्री खकाळे, ऋतुजा जाधव,मृगया निकुंभ,मानसी राणे, मोनिका तनेरू परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment