तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेले मुस्लिमेतर खेळाडू              जागतिक क्रिकेटमध्ये जे काही देश खेळतात त्यात पाकिस्तानचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. पाकिस्तान क्रिकेटमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच एक मुस्लिम राष्ट्र म्हणून कट्टर आहे. पाकमध्ये मुस्लिम लोक बहुसंख्येने आहेत. त्याचप्रमाणे इतर धर्मीय लोकही तेथे वास्तव करतात. परंतु पाकच्या घटनेनुसार तेथील प्रमुख पदावर उदा. राष्ट्रपती, पंतप्रधान, लष्करप्रमुख, सरन्यायाधीश, देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारी व्यक्ती मुस्लिमेतर असू शकत नाही. या पदावर फक्त मुस्लिम व्यक्तिच असाव्यात असे तेथील राज्यघटनेत स्पष्टपणे लिहीले आहेत. तरीही त्यांच्या विविध क्षेत्रात इतर धर्मातील गुणवान लोकही कार्यरत आहेत. परंतु तेथील उच्च पदे ते भुषवू शकत नाहीत. परंतु मुस्लीम धर्म स्विकारला तर ते उच्य पद मिळवू शकतात. येथे आपण काही इतर धर्मीय क्रिकेट पंटूवर दृष्टीक्षेप टाकू की, ज्यांनी पाकचे प्रतिनिधित्व व नेतृत्व केले.  

            वालिस मथैयस : - पाकिस्तानकडून खेळणारा हा पहिला गैरमुस्लिम खेळाडू होय. २१ कसोटयात २४ च्या सरासरीने ७८३ धावा त्याने ठोकल्या. फलंदाजीत त्याची आकडेवारी नजरेत भरणारी नसली तरी एक क्षेत्ररक्षक म्हणून तो अव्वल दर्जाचा होता. कसोटीत त्याने २२ झेल घेतले होते.ती कामगिरी त्या जमान्यात खास समजली जायची.

         अँटाओ डिसूझा : - मुळ गोव्याचा असलेला हा खेळाडू. भारत - पाक फाळणीनंतर त्याचे वडिल पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले. अँटाओला पाककडून केवळ सहा कसोटयाच खेळायला मिळाले. त्यात त्याने १७ बळी घेतले. सन १९६२ चा इंग्लंड दौरा त्याच्यासाठी  विशेष अविस्मरणीय ठरला. त्या मालिकेत तो खेळलेल्या सहापैकी पाच डावात नाबाद राहिला. त्यामध्ये त्याने ५३ ची सरासरी साधली होती.

               डंकन शार्प : - हा अँग्लो पाकिस्तानी खेळाडू. एक फलंदाज म्हणून नावाजलेला होता. त्याला पाककडून केवळ कसोट्याच खेळायला मिळाल्या. त्यामध्ये त्याने २२.३३ च्या सरासरीने १३४ धावा काढल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७ सामन्यात १५३१ धावा काढताना २ शतके व ७ अर्धशतके ठोकली होती.

               

              युसुफ योहाना : - मुळचा हा ख्रिश्चन धर्मीय खेळाडू. पाकिस्तान कडून खेळलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक.९० कसोटीत ७५३०, तर २८८ वन डे मध्ये ९७२० धावा त्याने बनविल्या असून अनेक विक्रमही त्याच्या नावावर आजही अबाधित आहेत. कसोटी व वनडे मिळून ३९ शतके व ९७ अर्धशतके त्याच्या नावे आहेत. पाकिस्तानचा कर्णधार होण्याचे सर्व गुण त्याच्यात होते, तरीही केवळ घटनात्मक अडचणीमुळे तो संघाचे नेतृत्व करण्यास पात्र ठरत नव्हता. त्यासाठी त्याने सन २००५ मध्ये इस्लाम धर्माचा स्विकार केला. मोहम्मद युसुफ हे त्याचे धर्मांतरानंतरचे नाव होय. त्यानंतरच त्याला पाकच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद मिळाले.

           अनिल दलपत सोनवारीया : - पाकिस्तानकडून खेळणारा पहिला हिंदु खेळाडू ठरला. यष्टीरक्षक वासिम बारीच्या निवृतीनंतर अनिलने यष्टीमागे आपला हक्क सांगितला.९ कसोटी व १५ वनडेत त्याने पाकचे प्रतिनिधीत्व केले. यष्टीरक्षक म्हणून तो उजवा होता. परंतु फलंदाजीतील कमजोर बाजू त्याला संघातून डावलण्यास कारणीभूत ठरली.

           दानिश कनेरिया : - दानिश हा पाककडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून पाकच्या क्रिकेट इतिहासातला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधीक बळी घेणारा फिरकी गोलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सकलेन मुश्ताक व मुश्ताक अहमद यांचे फिरकी गोलंदाज मोठे नाव असले तरी ६१ सामन्यात २६१ बळी घेवून तो अग्रस्थानी आहे. सकलेनने ४९ सामन्यात २०८ तर मुश्ताक अहमदने ५२ कसोटीत १८५ बळी घेतले.केवळ मुस्लिम नसल्याने त्याच्या नावावर प्रकाशझोत पडला नाही व गुणवत्ता असूनही कारकिर्द लांबली नाही.

          सोहेल फझल : - हा धर्माने ख्रिश्चन होता. गुणवत्ताही अफाट होती. तरीही मोठया प्रमाणात संधी मिळू शकली नाही. याचे कारण तुम्हीच समजून घ्या. त्याला केवळ दोनच एक दिवशीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास मिळाले. त्यापैकी एक अविस्मरणीय ठरला. तो सामना होता १९८९-९० च्या चॅंपियन्स ट्रॉफीतील भारताविरुद्धचा. त्या सामन्यात पाक संघ प्रबंधनाने जेष्ठ फलंदाज जावेद मियाँदादच्या अगोदर फलंदाजीस पाठविले. मग त्यानेही आपल्यावरचा विश्वास ३ गगनभेदी षटकार मारून सार्थ ठरवत पाकची धावसंख्या २५० च्या वर पोहचवली. हा सामना पाकने ३८ धावांनी जिंकला.

          आता मोहींदर पालसिंग हा वेगवान गोलंदाज पाक संघात ३० जणात निवडला असून तो पाकच्या संघात निवडलेला पहिला शिख खेळाडू ठरू शकतो.

          


लेखक - क्रिकेट समिक्षक

 - दत्ता विघावे, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल.

प्रतिनिधी भारत. 
मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट.
मोबाईल - ९०९६३७

No comments:

Post a Comment