तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

लोणी खुर्द गावातील रयत शिक्षण संकुल मध्ये भारताचा ७३ वा स्वतंत्रदिनाचा ध्वजारोहण संपन्न

सात्रळ / प्रतिनिधी:
बाबासाहेब वाघचौरे 

लोणी खुर्द गावातील रयत शाळेच्या प्रांगणात जवळपास तीन हजार हुन अधिक माध्यमिक, उच्च माध्यमिक, व एक्सलन्स स्कूल च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी, स्थानिक स्कूल कमिटी प्रतिनिधी, ग्रामस्थ,पालक, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समवेत ध्वजारोहण रयत शिक्षण संस्थेचे सदस्य सन्मा.श्री एकनाथ घोगरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
      तद्नंतर भारतमातेला वंदन करुन राष्ट्रध्वजाला संचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली.
      याप्रसंगी रयत शिक्षण संकुल लोणी चे प्राचार्य गमे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 
    त्यानंतर राष्ट्रध्वजाच्या ध्वजारोहण कार्यक्रम उद्देशून संदेशपर मनोगतात बोलताना संस्थेचे सदस्य सन्मा.श्री एकनाथ घोगरे पाटील यांनी सांगितले .स्वातंत्र्य नंतर आजपर्यंतची या देशाची वाटचाल वेगळी आहे. देशाचे एक वेगळा वैशिष्ट्य आहे. हा देश सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचाराचा पुरस्करता आहे. देशाच्या स्वातंत्र्यसाठी व सार्वभौम टिकवण्यासाठी अनेक नेत्यांनी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे.
     महात्मा गांधी, महात्मा फुले, सरदार पटेल, सुभाषचंद्रबोस, पंडीत नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग हा फक्त देशाचा स्वातंत्र्य असा समाजला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे या महान विभुतीनी पाहिलेले स्वप्न १५ ऑगस्ट १९४७ रोजी पुर्ण झाले.
    भारताला स्वातंत्र्य मिळाले ही काय साधी बाब नाही. हे सर्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या घरोघरी शिक्षणाची गंगा पोहचवली. या सत्कार्यात व पुरग्रस्तांना मदतीसाठी आपन सर्वानी हातभार लावण्याचे आवहान घोगरे पाटील यांनी केले.
मा.बाळासाहेब विखे,उत्तमराव आहेर,मा.श्रीकांत मापारी, जनार्दन घोगरे,आबासाहेब आहेर,   शिवाजी आहेर,आनिल आहेर, कैलास आहेर,भास्कर दिघे, भास्कर घोगरे,दिलीप आहेर, आदी ग्रामस्थ मोठया उपस्थित होते.पालक ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती लक्षणीय होती.
      यानंतर श्री पलघडमल यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व पालक ग्रामस्थ यांचे आभार मानले.

No comments:

Post a comment