तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

सात्रळ महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्नसात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
 लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे  वाणिज्य विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० साठी वाणिज्य मंडळाचे उदघाटन सौ.श्रद्धा बाजारे पाटील (सी.ए .फायनलिस्ट , लोणी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.१०.०८.२०१९ रोजी सकाळी १०.०० वा.वाणिज्य विभागात संपन्न झाले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या  श्रीमती जयश्री सिनगर या होत्या.
         सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सौ. श्रद्धा बाजारे पाटील यांनी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः ची कारकीर्द घडविण्यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. विविध शाखांपैकी वाणिज्य हि सर्वात स्वस्तात  शिक्षण देणारी शाखा असून या  शाखेमध्ये मुख्यतः सी.ए., सी.एस., सी.एम ए.,एम.बी.ए., बी.बी.ए. बी.कॉम , एम.कॉम.,एम.पी.एस.सी., यु.पी .एस.सी.,नेट / सेट बँकिंग परीक्षा , जी. एस. टी.  कन्सल्टन्ट , टॅक्स  कन्सल्टन्ट एल.एल.बी., एल.एल.एम.,इ. अनेक संधी याशाखेतून विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतात व या  क्षेत्रात कधी मंदी येत नाही.पैशाचे व्यवहार रोजच चालतात असे सांगताना भारतात केवळ २.५ लाखाच्या दरम्यान सी.ए. झालेले लोक आहेत असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर वाणिज्य शाखेचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार  अधिक मागणी असलेल्या वाणिज्य क्षेत्रात येऊन स्वतः ची किंमत अधिक वाढवावी असे आवाहन केले . मा. प्राचार्या  श्रीमती जयश्री सिनगर यांनी उपस्थित विद्यार्थांना  सौ. बाजारे यांनी सांगितलेल्या विविध वाणिज्य शाखेतील वाटा जे  तुमचे उद्दिष्ट् असेल व आवडीचे असेल त्या शाखेत आपले उत्तुंग करियर करावे त्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था कायम आपल्या पाठीशी उभी राहून प्रेरित करत असते या संधीचा विद्यार्थांनी फायदा घेतला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
         सदर कार्यक्रमात डॉ. ताजने यु . ए. यांनी  सूत्रसंचालन केले व आभार व्ही जी शिंदे यांनी मानले   . सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.घोलप डी .एन ,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. घाणे डी .एन  ,प्रा. दिघे व्ही .के.प्रा.एच एल दिवेकर हे उपस्थित होते  , सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते

No comments:

Post a comment