तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

२ कोटी ५० लाख रुपये खर्चून बांधली सुसज्ज इमारतीचा ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पणपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. १२ ------- तालुक्यातील नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या मंगळवारी (ता. १३) होणार आहे.

  राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत परळी मतदारसंघात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी पोहनेर, धर्मापूरी व नागापूर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर वडखेल व नागदरा येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणली होती, त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. ही सर्व आरोग्य केंद्राचे पूर्णत्वास आली असून धर्मापूरी व पोहनेर केंद्राचे नुकतेच लोकार्पण त्यांनी केले होते, आता नागापूर आरोग्य केंद्राचे लोकार्पण उद्या होणार आहे. आरोग्य केंद्राची नवीन इमारत उभारण्यात आल्यामुळे परिसरातील रूग्णांची चांगली सोय झाली झाली असून  अधिकाधिक आरोग्य सुविधा या माध्यमातून सर्व सामान्यांना मिळण्यास मदत होणार आहे.

  सकाळी ११ वा. नागापूर येथे होणा-या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, सभापती राजेसाहेब देशमुख, संतोष हंगे, युध्दजित पंडित, शोभाताई दरेकर,   भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, उप सरपंच शिवराज मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी व भाजपच्या पदाधिका-यांनी केले आहे.

No comments:

Post a comment