तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

सात्रळ महाविद्यालयात सहकार महर्षी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची ११९ वी जयंती साजरी      सात्रळ प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत), प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे सहकार महर्षी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील  यांची ११९ वी जयंती आज दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.नीलिमा क्षत्रिय, (जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त २०१९) या होत्या  व अध्यक्ष म्हणून मा. अड श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती, तसेच सदस्य मा.रंगनाथ दिघे पाटील, मा.जयवंत जोर्वेकर, मा.बाबुराव पलघडमल हे हजर होते.  सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.श्रीमती.जयश्री सिनगर व प्रा. दिपक घोलप उपप्राचार्य यांच्या  हस्ते सर्व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

                    प्रमुख पाहुण्या मा.नीलिमा क्षत्रिय यांनी पद्मश्री हे वटवृक्षाप्रमाणे छाया देणारे निस्वार्थ, पवित्र असे थोर व्यक्तिमत्व होते, त्यामुळेच ते आशियाखंडातील सहकार तत्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी लढूण न्याय देऊ शकले.

मा.नीलिमा क्षत्रिय यांच्या दिवस आलापाल्लीचे या पुस्तकास आजपर्यंत २ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यात आता जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, प्रवरानगर या प्रवरेच्या उत्कृष्ट पुरस्काराची भर पडली आहे. त्यांनी या पुस्तकाबद्दल सांगताना लेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहनाची  गरज असते असे सांगत या पुस्तकामध्ये लहानपणच्या आलापल्ली गावातील अनुभव व्यक्त केले.

      सदर जयंती कार्यक्रमानिमित महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती.जयश्री सिनगर यांनी पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटीलांनी सहकाराची मुहूर्त मेड रोउन शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले असे सांगून महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणेच पद्माश्रींना वाचावे, समजावे व आचरणात आणावे कारण त्यांनी आरोग्य, शिक्षण, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, असे सांगितले.

      सदर जयंती निमित्त महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या, या वक्तृत्व स्पर्धेत गुणानुक्रमे गागरे पूनम व लोखंडे अश्विनी यांनी विभागून प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय कुलधरण गौतमी, तृतीय क्रमांक  पवार मनीषा यांनी प्राप्त केला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम पवार माधुरी, द्वितीय औताडे करण तृतीय लोखंडे ज्योती अशा क्रमांकाने विजयी झाले. याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी लोखंडे अश्विनी व गागरे पूनम तसेच मराठी विभागाचे डॉ.नवनाथ शिंदे यांनी पद्मश्रीच्या साधी राहणी व उच्च विचारसरणीनुसार केलेल्या कार्याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.कार्ले सी एस  यांनी केले, प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक प्राध्यापाकेतर सेवक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनंत केदारे  व प्रा. सुसर एस आर  यांनी केले व उपप्राचार्य प्रा.दीपक घोलप यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment