तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 August 2019

गेवराई शहरात गौरी मखर देखावा स्पर्धेचे भव्य आयोजनसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ नगर परिषद गेवराई यांच्या वतीने गौरी आगमन निमित्त नवीन संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने 'स्वच्छ गेवराई, सुंदर गेवराई' अशा आशयाची गौरी मखर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
       या स्पर्धेत स्वच्छ शहर करण्यासाठी नागरिकांची जबाबदारी , पाणी बचतीचे उपाय, वृक्ष लागवड, स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषंगिक घनकचरा व्यवस्थापन , स्वच्छ रस्ते, स्वच्छ सार्वजनिक व्यापारी पेठ, सार्वजनिक ठिकाणे, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तु बनविणे या विषयावरील देखावे गौरी समोर आपापल्या घरी करुन २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत नगर परिषद मधील रूम नं १० येथे नोंदवावीत. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे  बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे.
       प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घेणाऱ्यांंना पैठणी साडी, सन्मानचिन्ह , वृक्ष रोप, ग्रंथ देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी कक्ष क्र. १० मध्ये दिनेश औटे यांच्याशी संपर्क साधावा व नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment