तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

चिन्मयानंद संस्थान कडून पुरग्रस्तासाठी पाच लाखांचा निधी
बीड (प्रतिनिधी) :- उमरखेड येथील चिन्मयानंद संस्थानचे मठाधिपती प. पू. माधवानंद महाराज यांनी कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाच लाख रुपये दिले आहेत. बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे मंगळवारी धनादेश सुपूर्द करण्यात आला.

उमरखेड येथील चिन्मयानंद संस्थानचे मठाधिपती प. पू. वामनानंद महाराज यांचा चातुर्मास यंदा बीडमध्ये सुरू आहे. त्यानिमित्त हजारो भक्त राज्यभरातून बीडमध्ये दर्शनासाठी दाखल होत आहेत. या चातुर्मासात मठाधिपतींनी राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सह्ययता निधीत पाच लाख रुपयांची मदत देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर मंगळवारी माधवानंद महाराज यांनी बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी कुलमुखत्यार त्रिंबकराव कुलकर्णी यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरग्रस्तांनी संकटातून लवकर बाहेर येऊन त्यांना आधार मिळावा, त्यांना धैर्य मिळावे यासाठी नामस्मरण आणि प्रार्थना करण्यात आली.

No comments:

Post a comment