तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

शोबाजीपायी सरकार जनतेला उपाशी मारेल- धनंजय मुंडे


शासकीय मदतीवरील स्टीकर प्रकरणी सरकारला झापले

सांगली/सातारा (प्रतिनिधी) :- दि.10........... प्रचंड संकटातही सरकार केवळ शोबाजी करीत असून, त्या पोटी ते जनतेला उपाशी मारायला ही कमी करणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना हे सरकार म्हणजे सेल्फीश असल्याचे म्हटले आहे.

इचलकरंजी येथील भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांनी पुरग्रस्तांसाठी आलेल्या गहु आणि तांदळाच्या पॅकेटवर मुख्यमंत्र्यांसह स्वतःचा फोटो आणि स्थानिक पदाधिकार्‍यांची नावे असलेले स्टीकर चिटकावुन त्याचे वाटप केले. शासकीय मदतीचा पक्षाच्या प्रचारासाठी होत असलेल्या या वापरावर धनंजय मुंडे यांनी कडाडुन हल्ला करताना, सरकारची प्रामाणिकता कशाला तर स्टीकर छापायला, स्टीकर छापण्यासाठी पुरग्रस्तांना तब्बल दोन दिवस मदत दिली नाही, असा आरोप केला. पुरग्रस्तांची लेकरे-बाळे उघड्यावर पडली आहेत, यांना मात्र स्वतःचे फोटो टाकत स्टीकर डीझाईन प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल असे म्हणत सरकारच्या जाहीरातीवर त्यांनी तिव्र रोष व्यक्त केला आहे.

No comments:

Post a comment