तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

वेदमूर्ती भगवान जिव्हेश्वर मूर्तीच्या आगमन प्रित्यर्थ व जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.....*गोरख पवार वैजापूर औरंगाबाद*

साळी समाजाचे आराध्य दैवत वेदमूर्ती भगवान जिव्हेश्वर मूर्तीच्या आगमन प्रित्यर्थ व जयंती उत्सवानिमित्त वैजापूर येथे दि. 13 मंगळवार रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.                                                               वैजापूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर मध्ये साळी समाजाचे दैवत भगवान जिव्हेश्वर यांची नुकतीच मूर्ती आणण्यात आलेली आहे . तसेच दिनांक 13 रोजी भगवान जिव्हेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष साबेर खान हे राहणार आहेत, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉक्टर दीनेश परदेशी , न. प. गटनेते  प्रकाश चव्हाण , माजी नगरसेवक रामदास टेके,  नगरसेवक ज्ञानेश्वर टेके,सुरेश टेके,मुकुंद दाभाडे व प्रकाश माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह तज्ञ डॉ. तुषार चुडीवाल,  नेत्ररोग तज्ञ डाॕ. रोहीत बंग,जनरल फिजिशियन डॉ. सुभाष शेळके, आर्थोपेडीक तज्ञ डाॕ. सुहास राहणे,  बालरोग तज्ञ डॉ.अमोल अन्नदाते , स्त्रीरोग तज्ञ डाॕ.कविता शेळके तसेच रक्तदान शिबिर हे औरंगाबाद   ब्लड  बँके तर्फे करण्यात येणार आहे , मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान जिव्हेश्वर मंदिर समिती,  साळी समाज, जिव्हेश्वर युवक मंडळ वैजापूर यांनी केला आहे.

No comments:

Post a comment