तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

पोलिस खात्याला समर्पित कोण होणार करोडपतीचा स्वातंत्र्यदिन विशेष- कर्मवीर स्पेशलमध्ये दिसणार सिध्दार्थ - अंकुश ची जोडी


मुंबई (प्रतिनिधी) :-
'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...'  हे ब्रीद असणारं आपलं पोलिस खातं. आपल्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या पोलिस खात्याला सलाम म्हणून स्वातंत्र्यदिनादिवशी होणारा "कोण होणार करोडपती"चा कर्मवीर स्पेशल भाग याच पोलिसांना समर्पित असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत अभिनेता अंकुश चौधरी आणि सिध्दार्थ जाधव पोलिसांच्या कल्याण निधीसाठी प्रश्नांचा हा खेळ खेळणार आहेत. तर हा आठवडा कोण होणार करोडपतीचा शेवटचा आठवडा आहे. यात कोण-कोणते महारथी सहभागी होणार आणि अंकुश - सिध्दार्थ ची जोडी पोलिस कल्याण निधीमध्ये कितीची भर करणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा कोण होणार करोडपती, फक्त सोनी मराठीवर...... छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

No comments:

Post a comment