तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

सात्रळ महाविद्यालयातील रासेयो मार्फत पूरग्रस्तांना मदतीचा हात

      सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
 - लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ), प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पश्चीम महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन हजारो लोक बेघर झाले त्यांना माणुसकीच्य नात्याने राष्ट्रकल्याणासाठी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे माझ्यासाठी नाही तर तुमच्या साठी या हेतूने महाविद्यालयातील  स्वयंसेवकानीं कोल्हापूर व सांगली भागातील पूरग्रस्तांना  मदत व्हावी यासाठी सात्रळ गावामध्ये मदत फेरी काढून रोख स्वरूपातील निधी तसेच अत्यावश्यक वस्तूचे संकलन करून सदर निधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना मदत पाठवली जाणार आहे.

प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती.जयश्री सिनगर व उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप, तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित भडकवाड, प्रा. प्रशांत हराळे, प्रा. लतिका पंडूरे,  तसेच महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक  व  प्राध्यापाकेतर सेवकांचे मौलिक सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment