तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रम संपन्न


सोनपेठ : येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज दि. 29 अॉगस्ट रोजी क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांची जयंती व फिट इंडिया मूवमेंट कार्यक्रमा अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. बालासाहेब काळे, प्रा. डॉ. बापुराव आंधळे, प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. आशोकराव जाधव, प्रा. डॉ. संतोष रणखांब व प्रा. गोविंद वाकणकर उपस्थित होते.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने युजीसीच्या परिपत्रकानुसार फिट इंडिया मुव्हमेंटचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनानुसार दुरदर्शनवरून प्रसारीत करण्यात आलेला कार्यक्रम दाखवण्यात आला. तसेच 10000 पावले चालण्याचा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना शारीरिक सक्षततेची शपथ देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोविंद वाकणकर,सुत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. संतोष रणखांब तर आभार प्रा. डॉ. अशोक जाधव यांनी केले. प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्राचार्य डॉ. शकिला शेख, बहन मिरादिदी, प्रा. अंगद फाजगे, प्रा. विकास रागोले, प्रा. विशाल राठोड, प्रा.पांडूरंग फले, प्रा. भैय्यासाहेब जाधव, प्रा. पंडित राठोड, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. राहुल साठे यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a comment