तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

अभिनव विद्यालयात क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे संस्थेचे सचिव साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेतील सहशिक्षक सूर्यकांत आनकाडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली या कार्यक्रमादरम्यान शाळेतील सहशिक्षिका सौ ज्योती देशमुख यांनी क्रांती दिनाची माहिती सांगितली मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली छोडो भारत ची गर्जना ‍आणि दिलेला करेंगे या मरेंगे हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला आता प्रत्येकजणच पुढारी होईल. जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्याची लुटालूट असे प्रकार सुरू होते सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार हरवले गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले पण जगभरातील परिस्थिती बदलत होती असे प्रतिपादन ज्योती देशमुख यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती देशमुख यांनी केले तसेच या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment