तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

संस्कार प्राथमिक शाळेत दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
संस्कार प्राथमिक शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचे कलागुण वृध्दीगत करण्यासाठी प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून संस्कार प्राथमिक शाळेत दि.28 ऑगस्ट 2019 रोजी वार बुधवार या दिवशी सकाळी 11 वाजता मारोती मंदिर जवळ, पद्मावती गल्ली या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून परळीचे नायब तहसीलदार श्री बरदाळे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. वीणा पारगावकर, डॉ. रंजना घुगे, सौ. सुचिताताई पोखरकर, रेणुकाजी टाक, सारीका परळीकर, पञकार श्री दत्ताजी काळे, पञकार श्री बुरांडेअप्पा, श्री. शंकरराव पेंटेवार, सौ. तोष्णिवाल, कार्यक्रमाचे अध्यक्षा आदर्शशिक्षिका तथा परळी भुषण श्रीमती गित्ते पी.आर.आदिंची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती साविञीबाई फुले, कै. विठ्ठलरावजी तांदळे, भगवान श्रीकृष्ण यांचे प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी व्यापीठावर उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे वृक्ष रोपे देवून स्वागत करण्यात आले.
पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे सर यांच्या मार्गदर्शन, संस्कार दहीहंडी महोत्सवाची सुरूवात झाली यावेळी शाळेतील बालगोपाळ विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेतील बालगोपाळांनी व पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
राधाकृष्ण वेशभुषा स्पर्धेत इयत्ता 1 ली तील कृष्ण वेशभुषा स्पर्धेत चि . शिंदे दक्ष दयाल (प्रथम), चि.उंडे ऋषिकेश नारायण (व्दितीय), सोनवणे स्वराज संतोष (तृतीय) तर राधा  वेशभुषा  स्पर्धेत कु. उंडे गायञी गणेश (प्रथम), कु. दिक्षित सिध्दी सचिन (व्दितीय), कु. केंद्रे पंकजा गणेश (तृतीय) या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. यामध्ये 1 लीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मला, दुसरी  व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गोविंदा रे गोपाळा, पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी रिमिक्स दहीहंडी सॉंगवर बहारदार नृत्य सादर केले.
या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी दहीहंडीला मुलींच्या गोविंदा पथकांनी मच गया शोर या गीतावर नृत्य सादर करीत दहीहंडी सलामी देण्यात आली. मुलांनी बोल बजरंग बली की जय या गीतावर नृत्य सादर करीत संस्कार गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली. 
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री उरगुंडे सर यांनी तर प्रास्ताविक श्रीमती सोळाके मॅडम तर आभार श्री अनकाडे सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी, पालक यांचे मौलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a comment