तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

सिद्धार्थ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनऔरंगाबाद (प्रतिनिधी) : - मिटमीटा येथील सिद्धार्थ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१५ ऑगस्ट २०१९ गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी आठ वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात येणार आहे, तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्य दिन उत्सव समारंभाचे औचित्य साधून देशभक्ती पर व भीमगीत गायन स्पर्धा होणार आहे, व्याख्यानाचेही आयोजण यावेळी करण्यात आलेले आहे , ही स्पर्धा खुली व निशुल्क आहे,तरी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक डॉ. मिलिंद आठवले यांनी केले आहे.

No comments:

Post a comment