तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकी संदर्भात घेतलेला निर्णय राजकीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो : सचिन बनसोडे


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : राज्यसरकारने विद्यार्थी निवडणुकी संदर्भात घेतलेला निर्णय राजकीय आहे. याचा मी निषेध करतो. कारण युवासेना-ABVP विरोधात सर्व समविचारी संघटनांना छात्रभारती विद्यार्थी संघटनेने एकत्र आणल्यामुळे यांना या निवडणुकीत घातपात किंवा पराभव होईल असा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे विद्यार्थी संघटनांना भीती वाटत आहे. आणि या गोष्टीचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत होईल याची सुद्धा भिती वाटत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलली आहे.

तसेच राज्यसरकारच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरमध्ये निवडणूक होतील अशी माहीत येत आहे ती नियमबाह्य आहे व कायद्याच्या विरोधात आहे. कारण कायदा सांगतो विद्यार्थी निवडणूक ह्या वर्षाच्या सुरुवातीला आणि पहिल्या सत्राच्या सुरुवातीस घेणे बंधनकारक आहे. मग नोव्हेंबरमधे निवडणुका कायद्याप्रमाणे होऊच शकत नाहीत. विधानसभाच्या आचारसंहिताचा कारण पुढे करत निवडणूक रद्द करणे याचा विद्यार्थी निवडणुकीशी काहीच संबंध नाही कारण विद्यार्थी निवडणुकीत राजकीय संघटना, पक्ष, झेंडा हे वापरता येणार नसताना ही कारण देऊन निवडणूक रद्द करणे आणि पुढे ढकलणे हे केवळ पराभवाच्या भीतीपोटी घेतलेला राजकीय निर्णय आहे, असे मत छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक सचिन बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
अधिक माहितीसाठी -
अ‍ॅड. सचिन बनसोडे 9594827100

No comments:

Post a Comment