तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

परळीच्या माहेश्वरी परिवाराकडून सांगलीच्या पूरग्रस्तांना रोख मदत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेली महापुराची स्थिती हे अत्यंत भयानक आणि गंभीर स्वरूपाची होती. या आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. महाराष्ट्रातून हजारो हात मदतीसाठी पुढे आले तसेच परळी वैजनाथ येथूनही माहेश्वरी समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील माहेश्वरी परिवारासाठी साडेतीन लाख रुपयांची रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम मंगळवार दिनांक 27 रोजी सांगली येथील माहेश्वरी परिवाराचे प्रमुख तथा जिल्हा सचिव श्रीकांत मर्दा आणि सदस्य मनमोहन कासट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी माहेश्वरी समाजाचे रामनिवास रांदड, जिल्हाधयक्ष गोविंद बजाज, अंबाजोगाई ता.अध्यक्ष सुभाष बाहेती, ललित बजाज, नंदकिशोर तोतला, जुगलकिशोर बांगड, जयप्रकाश बियाणी, रमेश सारडा, राजेंद्र मालपानी, नंदकिशोर होलाणी, सांगली येथील गोकुळ लड्डा, जाकोटीया आदी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील आलेल्या पुरामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. माहेश्वरी परिवारातील सर्वसामान्य कुटुंबाचेही या पूर्व परिस्थितीने वाताहत झाली. अतिशय कठीण प्रसंगाला ते तोंड देत असताना परळी माहेश्वरी परिवाराच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य माहेश्वरी परिवारातील गरजवंतांना रोख स्वरूपात साडेतीन लाख रुपये मदत सुपूर्द करण्यात आली. परळी वैजनाथ येथे मदत रक्कम जमा करण्यासाठी जुगलकिशोर लोहिया, रामनिवास रांदड, रामकिशन लड्डा, नंदकिशोर तोतला,  ओमप्रकाश तापडिया, जुगलकिशोर बांगड, रमेश सारडा, जयप्रकाश बियाणी, नंदकुमार होलानी, राजेंद्र मालपाणी यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a comment