तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन कार्यशाळा संपन्न


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व जिल्हा परिषद प्रशाला सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी उद्घाटक म्हणून सौ.ज्योती शिंदे (कदम),अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. किशोर धिवार, प्रा.उषा माने डॉ. अर्चना पारसेवार, रंजना डोंगरे, अस्मा खान व प्रा. डॉ. सुनिता टेंगसे मंचावर उपस्थित होत्या.
 शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने किशोरवयीन मुलींच्या समस्या बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावरील उपाय यावर पंडित गुरू पार्डीकर महाविद्यालयाच्या प्रा. उषा माने यांनी मार्गदर्शन केले. डॉ.अर्चना पारसेवार यांनी किशोरवयीन मुलींचे शारीरिक-मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या श्रीमती रंजना डोंगरे यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले. झाकीर हुसेन शाळेच्या श्रीमती अस्मा खान व डॉ. सुनिता टेंगसे यांनी प्रसारमाध्यमांचे किशोरवयीन मुलींवरील दुष्परिणाम आणि सावधानता यावर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांकडून किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन. संदर्भात मुलाखत अनुसूची भरून घेण्यात आली. या अनुसूचितील निष्कर्ष व उपायोजना जिल्हा शालेय विभागास कळविण्यात येणार आहेत.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.संध्या सूर्यवंशी व मधुरा आपटे यांनी केले स्वागत गीत कु. नेहा किरवले व शेख भगिनी यांनी सादर केले.  कार्यशाळेचेआयोजना बाबत संस्थाध्यक्ष मा. परमेश्वर कदम व प्राचार्य डॉ.वसंत सातपुते  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले  तर आभार श्रीमती आरती पतंगे यांनी मानले. या कार्यशाळत सोनपेठ परिसरातील इयत्ता सातवी ते दहावीच्या १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:

Post a Comment