तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

गेवराईत मातंग समाजाच्या मेळाव्यास उपस्थित रहावे - ब्रम्हदेव धुरधसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १२ _ मातंग समाजाच्या विविध अडचणीवर चर्चा करण्यासाठी गेवराई तालुक्यातील तमाम मातंग समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन सदरील मेळावा गेवराई शहरातील शिवाजी चौक येथे छञपती शिवाजी महाराज शाॅपिग सेंटर येथे दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे तरी गेवराई तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गेवराईचे माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे यांनी केले आहे.
            केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे, शासकीय योजनेचा लाभ मिळावा अशा विविध अडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच आ.लक्ष्मणराव पवार यांनी १५ लक्ष रुपये दिलेल्या समाज मंदिराचा भुमीपुजंन समारंभ होणार आहे. गेवराई तालुक्यातील तमाम मातंग समाजानी एकञ येऊन समाजाच्या मेळाव्यात सहभागी व्हावे तसेच दि.१६ शुक्रवार रोजी सकाळी ११ होणाऱ्या मातंग समाजाच्या मेळाव्यास बीड जिल्ह्याच्या खा. प्रितमताई मुंडे, आ.लक्ष्मणराव पवार, अमितजी गोरखे, मा.आ.सुधाकर भालेराव, मा.आ.पुथ्वीराज साठे, डि.पी.आय.चे अध्यक्ष अजिंक्य चांदणे, गेवराईचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, जि.प.सदस्य पांडूरंग थडके, मच्छिद्र जोगदंड, पं.स.सदस्य जगन आडागळे, नगरसेवक भरत गायकवाड आदि उपस्थित रहाणार आहेत तरी गेवराई तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment