तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

तुळशिराम पवार यांच्या कुटूंबियांचे मान्यवरांकडुन सांत्वनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- शिवसंग्रामचे बीड जिल्हाप्रमुख तुळशिराम पवार यांच्या मातोश्री सौ.पुष्पाबाई साहेबराव पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. या निमित्त तुळशिराम पवार यांच्या कुटूंबियांचे मिरवट येथे जावुन विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी सांत्वन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ.शालीनीताई कराड, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, नगरसेवक शरद मुंडे, भाजपाचे युवक नेते ज्ञानदेव तांदळे, जागृती पतसंस्थेचे चेअरमन प्रा.गंगाधर शेळके, युवक नेते निळकंठ चाटे, जिवराज ढाकणे, नगरसेवक चंदुलाल बियाणी, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव मुंडे, औ.वि.केंद्र ग्राहक भंडारचे चेअरमन विकास बिडगर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भिमराव सातपुते, वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायणराव सातपुते, इंटकनेते दत्तात्रय गुट्टे, नगरसेवक चंद्रकांतअप्पा समशेट्टे, डॉ.बालासाहेब कराड, नगरसेवक दिपक देशमुख, डॉ.काळे, माजी नगरसेवक ओमप्रकाश सारडा, भाजपाचे युवक नेते प्रल्हाद सुरवसे आदींसह अनेक मान्यवरांनी तुळशिराम पवार यांच्या कुटूंबियांचे मिरवट येथील निवासस्थानी जावुन सांत्वन केले.

No comments:

Post a comment