तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

पीक कर्ज वाटप प्रकरणी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार वसंतराव सिरस्करअरुणा शर्मा


 पालम :- पिक कर्ज वाटपात दलालांमार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बँकेकडून पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून पीक कर्ज वाटपात दलालांचा हस्तक्षेप थांबून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर यांनी दिला आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे तर काही शेतकऱ्यांनी नयाने पिक कर्ज उचलत आहेत त्यामुळे शेतकरी नयाने पिक कर्ज उचलण्यासाठी बँकेकडे चकरा मारत आहेत परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक आधी बँकेतील अधिकारी दलाला मार्फतच पीक कर्जाचे वाटप करीत आहेत. दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना ही नाईलाजाने दलालांमार्फत पैसे देऊन पीक कर्ज घ्यावे लागत आहे. मागील तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्ज उचलल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. अडचणीचा फायदा घेत बँकेतील अधिकारी दलालामार्फत पैसे घेऊन पीक कर्जाच्या फायली मंजूर करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दलाला मार्फतच बँकेकडे जावे लागत आहे दररोज दलाल बँकेत तळ ठोकून बसत असून भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक तातडीने थांबवावी व दलाला पायबंद घालावा. सर्व गरजू शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर, जि.प.सदस्य शंकर वाघमारे, उपसभापती रत्नाकरराव शिंदे, कादरभाई गुळखंडकर, भैया सिरस्कर, अर्जुन ढवळे, केशवराव कराळे, मारोतराव कराळे आदींनी दिला आहे.

No comments:

Post a comment