तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

श्रीकाशी महास्वामीजींचा बहात्तरावा जन्मदिनोत्सवमहाराष्ट्र व कर्नाटकातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काशीपीठाकडून तीन लक्ष रुपयांची मदत   -श्रीकाशीजगद्गुरू


पुणे, (प्रतिनिधी) :- दि. १३ ऑगस्ट २०१९-

अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेला पूर ही नैसर्गिक आपत्ती असून सर्व नागरिकांनी या आपत्तीचा धैर्याने सामना केला पाहिजे. शारीरिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत पूरग्रस्तांना करावयास हवी. काशीपीठाकडून कर्नाटक व महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तीन लक्ष रुपयांची मदत काशीपीठाकडून करीत आहोत, अशी घोषणा श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली.


पिंपरी चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात श्रीकाशीमहास्वामीजींचे श्रावणमास अनुष्ठान सुरू आहे. आज महास्वामीजींचा ७२ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या धर्मसभेत आशीर्वचन करताना ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर ष.ब्र. धारेश्वरकर, ष.ब्र. वाईकर, ष.ब्र. वसमतकर, बार्शीचे ष.ब्र. दहिवडकर व ष.ब्र. औंधकर आणि इतर अनेक शिवाचार्य उपस्थित होते. पूज्य महास्वामीजींच्या जन्मदिनोत्सवाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा दोनशेपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला.


यावेळी वैदेही नामक अनाथ मुलीच्या शिक्षणासाठी येणारा सर्व आर्थिक भार काशीपीठाकडून उचलण्यात येईल, अशी घोषणा श्रीकाशीमहास्वामीजींनी केली. यासाठी पंढरपूरचे श्री सुभाष म्हमाणे हे देखील साहाय्य करणार आहेत. 'बेटी पढावो' हे पंतप्रधानांचे घोषवाक्य श्रीकाशी महास्वामीजींनी येथे प्रत्यक्षात आणले. याशिवाय नेहमीप्रमाणे या कार्यक्रमात भक्तांकडून मिळणारी दक्षिणा ही शिक्षण फंडात घालून त्यातील व्याजातून सर्व समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना काशीपीठाकडून दरवर्षी नियमित शिष्यवृत्ती देण्यात येते.


श्रीकाशीमहास्वामीजींच्या जन्मदिनोत्सवाच्या निमित्ताने ७३ सुहासिनींनी त्यांना औक्षण केले. हजारो भक्तांनी महास्वामीजींची आरती केली. पुण्याचे शि.भ.प. शंकरमामा सर्जे यांनी भक्तमंडळीकडून छप्पन्न प्रकारची मिठाई (भोग) तयार करून ती प्रसाद म्हणून भक्तांना वाटली.


सकाळी तेलंगणाहून आलेल्या १२१ वैदिक माहेश्वरांकडून महास्वामीजींच्या इष्टलिंग पूजेच्या वेळी शतरुद्राभिषेक करण्यात आला. या भव्य कार्यक्रमात कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान येथील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थान वीरशैव समाजाच्या वतीने सर्व शिवाचार्यांचा, अनुष्ठान समितीचे प्रमुख श्री. महेश स्वामींचा व सर्व वैदिकांचा राजस्थानी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. पुण्यातील अनेक संस्थांनी महास्वामीजींना पुष्पहार व महावस्त्र अर्पण करून त्यांचा गौरव केला. या समारंभात अनुष्ठान समितीच्या वतीने पूज्य महास्वामीजींची विशेष गुरुवंदना करण्यात आली.

No comments:

Post a Comment