तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

समलिंगी विवाह करणाऱ्या महिला क्रिकेटपटू


 जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवी जीवाचा लग्नबंध परमेश्वराने अगोदरच लिहून ठेवलेला असतो. असा आपल्या समाजात समज आहे. भूतलवार आपल्याला फक्त त्या मार्गाने चालत जायचे असते. सर्वसाधारणपणे विषय लिंगी लोक एकमेकांशी विवाह करतात. परंतु निसर्गाच्या चक्राला डावलून काही चमत्कारी लोक समलिंगी विवाह  करतात. या मध्ये क्रिकेटपटूही मागे नाहीत. आतापर्यंत ३ महिला क्रिकेटपटू जोडप्यांनी एकमेकांशी विवाह केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही पुरुष क्रिकेटपटू जोडप्याने एकमेकांशी विवाह केला नाही. याच मुद्दयाचा धागा पकडून समलिंगी विवाहाविषयी माहिती जाणून घेऊ या.                                समलिंगी विवाह दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व आर्जेन्टिना या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेक्टिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्स व व्हरमाँट या  राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.

               भारतीय घटनेच्या सेक्शन ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे ( १ )हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले.
              भारतामध्ये लैंगिकता हा एक वादग्रस्त सामाजिक विषय आहे व समलैंगिकता ही व्यापकपणे 'मानसिक विकृती' समजली जाते. समलैंगीक व्यक्तींना पारंपारिक समाजात अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक समलिंगी व्यक्तींना अश्या प्रकारे समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन किंवा वरील नमूद केलेल्या कायद्याचा दाखला देऊन 'तुम्ही या कायद्याने सांगितल्याप्रमाणे गुन्हा केला आहे' असे सांगून, अटक करवण्याच्या धमकीने लुबाडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
               हिंदू विवाह अधिनियमानुसार समलिंगी विवाह वैध आहे असा युक्तीवाद लढवला जाऊ शकतो, कारण हिंदू धर्मामध्ये विवाह दोन भिन्न लिंगांच्या व्यक्तींदरम्यानच व्हायला हवा असा स्पष्ट उल्लेख नाही.

             लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत. पण लैंगिक संबंधांचा हेतू हा फक्त मुल जन्माला घालणे नसून परस्परांना आनंद देणे हा आहे. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या आनंदासाठी केलेला लैंगिक अविष्कार हाच या संबंधांचा मूळ हेतू आहे.

               समलिंगी आकर्षण हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. साहित्य,शिल्प,कला या प्रकारच्या माध्यमातून ते आढळून येत. पण त्याकाळी याविषयी समाजात खुलेपणाने बोलले जात नसे.एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानले जायचे. अमेरिकन मानसशास्त्र संस्थेने वैद्यकीय संशोधन करून समलैंगिकतेची व्याख्या "लैंगिकतेच्या विविध अविष्कारापैकी एक" अशी केली आहे. समलिंगी असणे हा मानसिक रोग किंवा विकृती नाही. ती शरीराची व मनाची एक अवस्था आहे. भिन्नलिंगी आकर्षणाप्रमाणे समलिंगी आकर्षणही नैसर्गिकच आहे. या व्यक्तींची बौद्धिक क्षमता, जडणघडण भिन्नलिंगी व्यक्तीप्रमाणेच असून या व्यक्तीही निरोगी आयुष्य जगू शकतात.

             दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वॅन निकर्क आणि तिची सहकारी क्रिकेटपटू मेरिझेन कॅप यांनी शनिवारी एकमेकींशी विवाह केला. विवाहानंतर सोशल मीडियावर त्यांनी या घटनेची माहिती आणि छायाचित्रे शेअर केली. 'आय डू' म्हणजे मी केले, असे त्यांनी या पोस्टसोबत लिहिले आहे.

             दक्षिण आफ्रिकेच्या या दोन्ही स्टार खेळाडू आंतरराष

No comments:

Post a Comment