तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून द्यावीत : छात्रभारतीचे रोहित ढाले यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : छात्रभारतीने पूरग्रस्त भागातील सांगली, कोल्हापूर व सातारा विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्याची केली मागणी. 
राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सर्वस्व वाहून गेले आहे. आत्ता पूर ओसरल्यानंतर लोक आपल्याला घरी पोहचत आहेत. 
तेव्हा शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोठं आव्हान उभं राहणार आहे. मुलांची वह्या-पुस्तक सर्वच साहित्य पुरात वाहून गेलं आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने राज्यसरकारने पहिली ते बारावी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आज मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याकडे केल्याची माहिती राज्यसंघटक सचिन बनसोडे यांनी दिली. 
मा. शिक्षणमंत्री यांनी यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिली आहे. 
अधिक माहितीसाठी
सचिन बनसोडे, राज्यसंघटक छात्रभारती
9594827100

No comments:

Post a comment