तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

विद्यावर्धिनी विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  विद्यावर्धिनी विद्यालयात दि. 27/8/2019 मंगळवार रोजी गोपाळ काला निमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री.एम.टी.मुंडे साहेब प्रमुख पाहुणे परळी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.प्राजक्ता ताई भावड्या कराड तसेच आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्‍यक्षा सौ.सविता देवशटवार व संचालक सविता रायचूरकर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. उन्मेष मातेकर व प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री राजेश्वर नांदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.हा दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली चे विद्यार्थी राधा व कृष्णाच्या वेशभूषा परिधान करून आले होते.जणूकाही पृथ्वीवर कृष्ण आणि राधा प्रकट झाल्यासारखे वातावरण यावेळी निर्माण झाले होते. इयत्ता चौथीतील मुलींनी अतिशय सुंदर गवळण "माठ फोडीला गं माझा माठ फोडीला" सादर केली. वेशभूषेतील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पारसेवार मॅडम तर आभार प्रदर्शन सौ. पाटोळे मॅडम यांनी केले.

No comments:

Post a comment