तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

झाडांचे लागवडी बरोबरच वृक्ष संगोपन गरजेचे -ह.भ.प.वाघ
पुण्यस्मरणानिमित्त झाडांचे वाटप

सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
झाडांचे लागवडी बरोबरच वृक्ष संगोपन करणे गरजेचे असे प्रतिपादन ह.भ.प.मंगेश महाराज वाघ यांनी नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील कै.भानुदास भिमाजी भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निमित्ताने केले.
      भागवत कुटुंबीयांनी धार्मिक विधी बरोबरच कै.भानुदास भागवत यांचे मित्र,सवंगडी,नातेवाईक यांना एक आठवण तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने फळ झाडा बरोबरच इतरही झाडाचे वाटप करण्यात आले.
   यावेळी ह.भ.प.मंगेश महाराज वाघ यांचे प्रवचन यावेळी पार पडले.तसेच ह.भ.प.वाघ यांच्या शुभहस्ते व भागवत कुटुंब तसेच नातेवाईक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
    महत्त्वाचे असे की या फळ झाडांना कमी कालावधीत येतील असे झाडांचे वाटप करण्यात आले आहे. या वृक्षांची सर्वानी योग्य अशी जोपासना करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.
 यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटी चे अधिकारी सह,कर्मचारी, ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 अशा वेगळ्या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.असे राजेंद्र वाघचौरे यांनी सांगण्यात आले.

No comments:

Post a comment