तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांचे कडून पूरग्रस्तांना मदतअहमदनगर (प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यातील खळी गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय वंजारी समाजाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस तथा ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी कोल्हापूर, सातारा सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे बारा हजार रुपयांची मदत केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात प्रचंड पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे.जिकडे पाहावे तिकडे प्रचंड पाणीच पाणी या पूर परिस्थितीमुळे शेतीसह, व्यवसाय, उद्योगधंद्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.जनावरे दगावली,माणसे दगावली,ज्यांचे प्राण वाचले त्यांना घर नाही.अन्न नाही.कपडे नाही.अशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यांची झाली आहे.या पूरग्रस्तांना महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू असला तरी मदत सर्वांपर्यंत पोहचण्यात खूप अडचणी निर्माण होत आहे.समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनीही जगूया थोडे माणूसकीसाठी या भावनेतून बारा हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.तसेच जे उदारमतवादी पूरग्रस्थाना मदत करू इच्छितात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीती आपल्या कुवतीप्रमाणे रक्कम जमा करावी असे अवहान समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांनी केले आहे.

No comments:

Post a comment