तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

चिंतेश्वर विद्यालयाच्या वतिने मुकबधिर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १४ _ हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिन्यातील नारळी पोर्णिमेला बहिण भावाच्या अतुट नात्यांचा पवित्र समजला जाणारा रक्षाबंधन हा सन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाला हातात राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते. याच उद्देशाने शहरातील श्री. चिंतेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी बुधवार, दि. १४ आॅगस्ट रोजी रक्षाबंधन सनाचे औचित्य साधून निवासी मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना राख्या बांधुन मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांनसोबत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.
     भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री.चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई यांच्या वतिने प्रतिवर्षी शहरातील विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलिस स्टेशन, तसेच सिमेवरील जवानांना राख्या पाठवत असतात. यावर्षी मात्र शहरातील कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर निवासी विद्यालय व अस्थिव्यंग निवासी विद्यालय येथे दि. १४ ऑगस्ट बुधवार रोजी रक्षाबंधन सनाचे औचित्य साधून मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना राख्या बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ ढोबळे, अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून चिंतेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा मोरगांवकर उपस्थित होत्या. यावेळी शिवाजी ढोबळे, चंद्रकांत घोलप, प्रिती पुराणिक, सतिष यमगर यांसह विद्यार्थी व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
     यावेळी श्रीमती मोरगांवकर यांनी रक्षाबंधनाचे विशेष महत्त्व पटवुन दिले. त्या म्हणाल्या की, बहिण भावाच्या नात्यातील पवित्र समजला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. राखी बांधण्याचा अर्थ आपण बहिण-भावाच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहुन घेऊन बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारणे, राखी बंधनाच्या या सणातुन मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. भाऊ बहिनीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. आपल्या देशात बहिण-भावाचे प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम असल्याचे मत शेवटी बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सोमनाथ ढोबळे यांनी तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद पौळ यांनी केले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश कदरे, रविंद्र अरबाड, रामदास ढोबळे, प्रल्हाद बोंदरे, संदिप खाडे, तुकाराम बाबर, शिंदे सुशांत, कृष्णा लाटे, गोविंद कदरे, अकुंश लाटे, भागिरथी उगले, प्रशांत सरोदे, विष्णू बर्वे, विश्वास शेळके, संतोष पुंड, विठ्ठल भगत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment